भूगोल
भूगोल हा एक प्राचीन अभ्यास विषय आहे. पृथ्वी व पृथ्वीवरील विविध घटकांशी भूगोलाचा संबंध आहे. या घटकांचा अभ्यास प्राचीन काळापासून होत आहे. म्हणूनच भूगोल या विषयाचा जन्म फार प्राचीन काळात झाला असे म्हणतात. इ.स. पूर्व तिसऱ्या शतकात ग्रीक तत्ववेत्ता इरॅटोस्थेनिस याने (भूगोल) Geography हा शब्द सर्वप्रथम वापरला. हा शब्द ग्रीक भाषेतील Geographe या शब्दापासूनयार झाला. Geographe शब्दातील Geo म्हणजे पृथ्वी व Graphe म्हणजे वर्णन होय. भूगोल म्हणजे पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र होय. नंतर ‘भूगोल’ हे वितरणाचे शास्त्र आहे अशी व्याख्या करण्यात आली. त्यामुळे भूगोलास शास्त्रीय स्वरूप प्राप्त झाले. 16 व्या शतकात भूगोलाच्या अभ्यासात मानवाचा अंतर्भाव करण्यात आला त्यामुळे भूगोल विषयाचे स्वरूप अधिक गुंतागुंतीचे होत गेले. त्यामुळे भूगोलाच्या प्राकृतिक भूगोल व मानवी भूगोल अशा प्रमुख दोन शाखा उदयास आल्या.
No comments:
Post a Comment